Voter Registration 2023 नाव नोंदणीकरता वर्षातून चार वेळा संधी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Voter Registration 2023 आजपासून ते २० ऑगस्ट २०२३ या संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी भेटी देतील. आपल्या या भेटींमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांचे वैयक्तिक तपशील, पत्ता आणि छायाचित्रांची पडताळणी करतील, मृत आणि स्थलांतरीत मतदार, दुबार नोंदणी असलेले मतदार, मतदारांचाही शोध घेतील, तसंच मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया करतील. यासोबतच नव मतदार, तृतीयपंथी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीतील मतदार, देहव्यवसाय करणाऱ्या महिला मतदारांचा शोध घेऊन त्यांची तसंच मतदार यादीत नाव नसलेल्यांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करण्याचं कामही या काळात केलं जाणार असल्याचं श्री. देशपांडे यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे राज्यातील मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचे आणि अद्ययावतीकरणाचे काम सुलभ होऊ शकणार आहे, तसंच हा उपक्रम म्हणजे आपण आपल्या मताधिकारापासून वंचित राहू नये याची निश्चिती करण्याची नागरिकांसाठीची मोठी संधी आहे असं श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. त्यामुळेच जेव्हा हे अधिकारी आपल्या घरी येतील तेव्हा नागरिकांनी आपले स्वतःचे तसंच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत की नाहीत हे तपासून घ्यावे, ज्यांनी वयाची १८ वर्ष पूर्ण केली आहेत पण अजूनही मतदार नोंदणी केलेली नाही अशांची मतदार नोंदणी करून घ्यावी, मतदार यादीतील आपले वैयक्तिक तपशील, पत्ता यात काही दुरूस्त्या असतील तर त्यासाठीचे अर्ज भरून द्यावेत, लग्नानंतर नाव बदललेल्या स्त्री मतदारांनी आपली नावं बदलून घ्यावीत, स्थलांतरीत झालेल्यांनी नव्या पत्त्याची नोंद करून घ्यावी, असे आवाहन श्री. देशपांडे यांनी केलं आहे.

Police Patil recruitment :10 उत्तिर्णाना संधी!! जळगाव पोलीस पाटील भरती

मतदारांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होणार असल्याने, सर्व मतदारांनी त्यांच्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे आणि विनासंकोच आवश्यक ती माहिती आणि दस्तऐवज द्यावेत, असे आवाहनही श्री. देशपांडे यांनी केलं आहे. Voter Registration 2023

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी युवावर्गाला अधिक संधी

नाव नोंदणीकरता वर्षातून चार वेळा संधी उपलब्ध, एक जानेवारी या पात्रता तारखेसाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही.

17+वयोगटातील तरुणांना आगाऊ नोंदणीची सुविधा

17 वर्ष पूर्ण झालेल्या युवकांना आता त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी आगाऊ नोंदणीची सुविधा उपलब्ध असून त्यासाठी त्यांना 1 जानेवारी रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण असण्याच्या पात्रतेसाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही.

Voter Registration 2023 मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी यांना यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. युवकांना, त्यांचे नाव नोंदणीचे अर्ज एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबर या पात्रता तारखांच्या कालावधीत दाखल करता यावेत, त्यासाठी त्यांना एक जानेवारीची प्रतीक्षा करायला लागू नये यादृष्टीने तंत्रज्ञानावर आधारित आवश्यक उपाय योजावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.

E Pik Pahani Update 2023 :ई पीक पाहणी, पहा का कधी कशी करायची

यापुढे दर तिमाहीत मतदार याद्या अद्ययावत केल्या जातील. त्यामुळे पात्र युवक-युवतींची नाव नोंदणी त्या वर्षाच्या पुढील तिमाहीत केली जाऊ शकते ज्यामध्ये त्याने/तिने 18 वर्षे पात्रता पूर्ण केली आहे. नाव नोंदणी केल्यानंतर त्याला / तिला एक मतदार ओळखपत्र दिले जाईल.

सन 2023च्या मतदार यादीच्या वार्षिक पुनरिक्षणाच्या सध्याच्या फेरीसाठी, एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबर 2023 पर्यंत 18 वर्षे पूर्ण करणारा कोणताही नागरिक मतदार यादीचे प्रारूप प्रकाशन प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून मतदार म्हणून नोंदणीसाठी आगाऊ अर्ज सादर करू शकतो.

Voter Registration 2023 भारतीय निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा 1950 च्या कलम 14(b) मधील कायदेशीर सुधारणांच्या अनुषंगाने आणि पर्यायाने मतदार नोंदणी नियम, 1960 मध्ये आवश्यक ते बदल करून विधानसभा किंवा संसदीय मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या तयारी/पुनरिक्षणासाठी आवश्यक बदल करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.

मतदार केंद्र सुसूत्रीकरण

वार्षिक आढावा सराव पद्धतीनुसार, दिलेल्या वेळापत्रकानुसार आणि मतदान केंद्रावरील मॅन्युअल, 2020 मध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे 1500 पेक्षाजा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रात प्रारूप मतदार याद्यांच्या प्रकाशनापूर्वी सुधारणा केली जाईल.

Mofat Computer Yojana विद्यार्थ्यांना मिळणार 100% अनुदानावर संगणक

Voter Registration 2023 इलेक्ट्रॉनिक मतदार ओळखपत्र

आधार जोडणीमतदार यादीतील माहिती आणि मतदाराचा आधार क्रमांक लिंक करण्यासाठी, सुधारित नोंदणी अर्जात मतदारांच्या आधार कार्डाचे तपशील नमूद करण्यासाठी माहिती विचारण्यात आली आहे. तसेच सध्याच्या मतदारांचा आधार क्रमांक कळावा या उद्देशाने 6बी हा एक नवीन अर्ज देखील सादर करण्यात आला आहे. मात्र आधार क्रमांक सादर करणे अशक्य झाल्यास किंवा तशी माहिती पुरवण्यास असमर्थ ठरलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार नाहीत किंवा आधार क्रमांकाअभावी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठीचा कोणताही अर्ज नाकारला जाणार नाही.

अचूक मतदार याद्यांसाठी क्षेत्र पडताळणी आणि अधिक काळजीपूर्वक तपासणी

Voter Registration 2023 अचूक आणि अद्ययावत मतदारयादी तयार करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडून मतदार क्षेत्र पडताळणी करण्यावर भर दिला आहे.


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Voter Registration 2023 नाव नोंदणीकरता वर्षातून चार वेळा संधी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading