Kusum Solar Pump Yojana: कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत लाभार्थ्याच्या माध्यमातून नोंदणी केली जाते अर्ज पूर्ण केले जात आहेत. सर्व होत असताना बऱ्याचवेळा असे होत आहे की अर्ज पूर्ण झाला तर पुढील प्रक्रिया काय असणार याचबरोबर सोलर पंप लावण्यासाठी नेमका भरणा किती करावा व खर्च किती लागतो.आपण ह्या पोस्ट मद्धे बघणार आहे.
Kusum Solar Pump Yojana: प्रक्रिया
- अर्ज पूर्ण झाल्यानंतर अर्जाचे पात्रता चेक केली जाते.ज्यामध्ये जमीन, पाण्याचा सिंचनाचा उपलब्ध असलेला स्त्रोत, सामायिक क्षेत्रा असेल तर एनओसी दिलेली आहे का?, हे सर्व पाहिल्यानंतर अर्ज पात्र केला जातो.जर त्यामध्ये काही त्रुटी असेल बँकेचे पासबुक, सातबारा अस्पष्ट असेल किंवा काही चुकीच्या पद्धतीच्या नोंदी त्यामध्ये दिसत असतील तर ते अर्ज त्रुटी मध्ये काढले जातात.
- त्रुटी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना मेसेज देऊन त्या त्रुटी पूर्ण केल्या जातात.
- मात्र तुरटीमध्ये गेलेल्या अर्ज किंवा व्यवस्थित माहिती नसलेल्या अर्ज हे मोठ्या प्रतीक्षेत जातात.
- जे अर्ज पात्र झालेले असतात अशा अर्जाला पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जातात
हा अर्ज पुढे घेतल्यानंतर ज्यावेळी याची पुढील प्रक्रिया होते कोटा उपलब्ध होतो पंप लावण्याची प्रक्रिया चालू होते. - त्यावेळी पात्र झालेल्या शेतकऱ्यांना मेसेज देऊन सेल्फ सर्वे करण्यासाठी सांगितले जाते.
- यासाठी महाऊर्जेच्या माध्यमातून मेढ्याचे एक ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेले आहे.
- आपलिकेशन इन्स्टॉल करून शेतामध्ये सिंचनाचा स्त्रोत जमिनीचा फोटो आणि लाभार्थ्याचा फोटो असे काही फोटो अपलोड करून माहिती अपलोड करा.
- ज्या ठिकाणी सोलर पंप इन्स्टॉल करणार आहे त्या ठिकाणचे फोटो अपलोड करा.
- हा सेल्फ सर्वे झाल्यानंतर त्यामध्ये लाभार्थी जर पात्र असेल तर पुढे पेमेंटचे ऑप्शन दिल्या जाते.
- लाभार्थ्याकडून पेमेंट करून वेंडर सिलेक्शन करून पुढील प्रक्रियेमध्ये समाविष्ट केल्या जाते.
सोलर पंपासाठी पैसे किती लागतात
- यामध्ये नोंदणी करत असताना पूर्वी 100 रुपयाची नोंदणी फी आकारली जायची.
- ज्यामध्ये पाच अर्ज घेऊन महाभुलेखचा डाटा घेतला जात होता.
- परंतु बऱ्याच शेतकऱ्याचे एकच अर्जामध्ये होत असल्यामुळे अधिकचा भुर्दंड नको म्हणून एकच महाभुलेखला अर्ज करून 15 रुपयाची नोंदणी केलेली आहे.
- नोंदणीला 15 रुपयांचा नोंदणी फी आकारली जाते.
- त्यानंतर अर्ज पात्र, सेल्स सर्वे, पूर्णता पात्र झाल्यानंतर पेमेंटचा भरणा करण्यासाठी सागितल्या जाते.
पंपाची किंमत
- 3 HP च्या पंपाची GST सोबत किंमत 1 लाख 93 हजार 803 रुपये.
- 5 HP च्या पंपाचे GST सोबत किंमत 2 लाख 69 हजार 746 रुपये.
- 7.5 HP च्या पंपाची GST सोबत किंमत 3 लाख 74 हजार 402 रुपये.
- 3HP पंपाची खुल्या प्रवर्गासाठी मूळ किंमत 17 हजार 30 रुपये आणि GST चा भरणा 2 हजार 350 रुपये असे एकूण 19 हजार 380 रुपये हा 10% च्या प्रमाणामध्ये खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना भरणा करावा लागेल.
- अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी 5% ज्यामध्ये मूळ किंमत 8 हजार 515 रुपये त्यामध्ये GST 1 हजार 175 रुपये असे मिळून 9 हजार 690 रुपये भरावे लागतील.
- 5HP च्या पंपासाठी खुल्या प्रवर्गासाठी 10% नुसार मूळ किंमत 23 हजार 704 रुपये त्यामधे GST 3 हजार 271 रुपये असे एकूण 26 हजार 975 रुपये भरावे लागतील.
- अनुसूचित जाती जमातीसाठी 5% च्या प्रमाणामध्ये मूळ किंमत 11 हजार 852 रुपये त्यात GST 1 हजार 636 रुपये असे एकूण 13 हजार 488 रुपये भरावे लागतील.
- 7.5HP च्या पंपामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 10% च्या प्रमाणामध्ये मूळ किंमत 32 हजार 900 रुपये त्यात GST 4 हजार 540 रुपये असे एकूण 37 हजार 440 रुपये भरावे लागतील.
- अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 5% नुसार मूळ किंमत 16 हजार 450 रुपये त्यात GST 2 हजार 270 रुपये असे एकूण 18 हजार 720 रुपये भरणा करावा लागेल.
Discover more from
Subscribe to get the latest posts sent to your email.
[…] Kusum Solar Pump Yojana: प्रक्रिया आणि खर्चाची माहित… […]