Pavsali Adhiveshan 2023 संकट आल्यास पिक विमा आणि नाही आलं तरीही मिळणार 2 हजार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pavsali Adhiveshan 2023 राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यावर जर कोणतेही अडचणी आली तर त्यांच्या पाठिशी उभे राहील. यासाठी केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि १ रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संकट आलं तर पीक विमाचा लाभ मिळेल, नाही आलं तरीही नमो महासन्मान योजनेचा शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी ग्वाही कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

राज्यात कापूस दर, कांद्याचे अनुदान आणि पीक विम्यासंदर्भात काँग्रेसचे आमदार नाना पटोले, सुनील केदार, विश्वजीत कदम, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू, वैभव नाईक यांनी विधानसभेत सरकारच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना कृषीमंत्री मुंडे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

कृषिमंत्र्यांनी दिली ग्वाही Pavsali Adhiveshan 2023

पीक विमा योजना राबवत असताना महाविकास आघाडीच्या काळात राबविण्यात आलेल्या बीड पॅटर्नची अंमलबजावणी होणार आहे. अतिवृष्टी किंवा इतर संकटामुळे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना भरपाई न दिल्यास विमा कंपन्यांवर एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.

Sarkari Yojna

नवीन कृषिमंत्री होताच शेतकऱ्यांसाठी 3 मोठे निर्णय

तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्यांना पिक विमा योजनेंतर्गत विमा दिला जातो. अशातच शेतकऱ्यांना फक्त एका रुपयांत पिक विमा देण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला. त्यामुळे संकट आल तर शेतकऱ्यांना पिक विमा दिला जाईल. तसेच संकट आलं नाही तरी शेतकऱ्यांना केंद्राच्या ‘पीएम किसान योजने’च्या धर्तीवर राबवली जाणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चे 2 हजार दिले जातील अशी ग्वाही कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

Water Conservation Tips 2023 :चांगल्या फायद्यासाठी पाझर तलाव कोणत्या ठिकाणी बांधावा?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Pavsali Adhiveshan 2023 संकट आल्यास पिक विमा आणि नाही आलं तरीही मिळणार 2 हजार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!